धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..

धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..


३ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे पारितोषिकासह मालिकावीरांसाठी २ बाईकचे आयोजन ; ठाणे व रायगड जिल्ह्यात जय महाराष्ट्र चषकाची चर्चा..


पनवेल / प्रतिनिधी :

जय महाराष्ट्र संघ धामणी येथील तरुणांनी आगळा वेगळा आयोजन या क्रिकेट सामान्यांत करून दाखवले आहे. तीन लाखापेक्षा अधिक रक्कमेची क्रिकेट सामान्याचे आयोजन मंगळवार (दि. २५ फेब्रु. ते २ मार्च) रोजी केले होते. विशेष म्हणजे आता पर्यत आदिवासी समजतलं कोणालाही शक्य झाले नाही असे दोन मालिकावीरासाठी २ बाईक तर उत्कृष्ट गोलंदाज, फिल्डर, फलंदाज यांना ३ स्पोर्ट्स सायकल देखील ठेऊन या सामन्यात ५ फुटापेक्षा अधिक उंचीचे चषक पाहायला मिळाल्या. तसेच आयोजन हे कोणत्याही राजकीय नेत्यांचे नसून गावातील तरुणांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी काढून सामन्यांचे आयोजन यशस्वी केले. 

      २०२५ जय महाराष्ट्र चषकामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मंचावर उपस्थित राहत असणाऱ्यांकडून सातत्याने आयोजकांचे स्थूती होत होती. आदिवासी समाजात पहिल्यांदाच एवढ मोठं आयोजन असल्याने प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेट रशिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा हस्य दिसून येत होतो. या क्रिकेट सामन्यात अंतिम सामना रविवार (दि. २ मार्च) रोजी पार पडत असतांना क्रिकेट रशिकांची तुफान गर्दी पाहायला दिसत होती. लाईव्ह युट्युब चॅनेलवर चक्क ४० हजारापेक्षा अधिक लोक घरी बसून या क्रिकेट सामान्यांची मज्जा घेत होती. शेवठी, अंतिम सामन्यांमध्ये सुरेश ११ खांदा आणि बहनोली संघात मोठा संघर्ष होत असतांना सुरेश ११ खांदा (पनवेल) संघांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांकावर बहनोली (बदलापूर) संघाने नाव कोरले. तसेच तृतीय क्रमांक सावरसाई (पेण), चतुर्थ क्रमांक पोगाव (भिवंडी), पाचवे क्रमांक झुगरेवाडी (कर्जत), सहावा क्रमांक वाघाचीवाडी (panvel) संघांनी बाजी मारली. तर मोठ्या गटातील बाईक मालिकावीर झुगरेवाडीचा प्रवीण सावळा आणि लहान गटातील बहनोलीचा विलास हवाली बाईक मालिकावीर ठरला. त्यांचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज सुनिल नाईक, उत्कृष्ट फिल्डर महेश वाघ, उत्कृष्ट फलंदाज पोगावचा विश्वास यांना स्पोर्ट्स सायकल देऊन उत्तेजीत केले.  

     यावेळी बक्षीस वितरणाला  आदिवासी समन्वय समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, उद्योजक आंनता शिद, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सदस्य जयवंत भस्मा, समालोचनमध्ये सातत्याने चर्चा असणारे योगेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते रमेश पारधी, राघो भस्मा, बाळू खंडवी, आयोजकांचे सहकारी अजय भस्मा, अवी वाघ, मनोज फसाले, अमोल वीर, जय महाराष्ट्र संघाचे मुख्य आयोजक प्रकाश झुगरे, रामदास खंडवी, समीर खंडवी, कल्पेश खंडवी, पिंटू शिद, शत्रू झुगरे, सॅमी खंडवी , जगण झुगरे, सागर खंडवी, बाळू खंडवी, विलास खंडवी , अनिल निरगुडा, मंगेश खंडवी, राजा भस्मा, राजा खंडवी , भरत झुगरे, रवी झुगरे, अमर खंडवी, बाळू भस्मा, अरविंद खंडवी आदी. क्रिकेट रसिकांची उपस्थिती होती.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image