यश प्राप्तीसाठी प्रामाणिक व सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा - डॉ. देवानंद शिंदे

 यश प्राप्तीसाठी प्रामाणिक व सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा - डॉ. देवानंद शिंदे




पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँड सायन्स स्वायत्त कॉलेज महाविद्यालयातील पदवी आणि  पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आज (दि. ०३) सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात समारंभपुर्वक मोठ्या उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू, डॉ. देवानंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

            या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदेभागूबाई चांगु काना ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सानवी देशमुख  आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभलीया प्रसंगी प्राचार्य  प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि  आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध  विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबत उपस्थित होते.

सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भाषणात  नॅक मुल्यांकन प्राप्त केल्याबद्दल सीकेटी महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना संबोधित करताना, भविष्यात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक राहिले पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला  पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की कारणे सांगणारी माणसे मोठी होत नाहीत आणि मोठी माणसे कारणे देत नाहीत असे मार्गदर्शक तत्व सांगत तंत्रज्ञानाच्या जोरावर यश प्राप्त करता येते म्हणून भविष्यात संशोधन, तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे नमूद केले.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही उत्कृष्ट शिक्षण संस्था या ठिकाणी प्रत्येकाला संधी मिळत असते, त्यामुळे हि संस्था मोठी झाली आहे, असे सांगत संस्थेचे कौतुक केले. 

            लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. जीवनात पदवी टप्पा महत्वाचा असतो ती तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर मिळवली आहे. हि पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा असा मौलिक सल्ला देऊन  विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.

या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शानदार समारंभामध्ये एन.सी.सी. च्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरुवात सुरेल राज्य गीताने झाली. त्यानंतर  प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. व्ही. येवले यांनी करून दिली. या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य  प्रो . डॉएसकेपाटील यांनी कौतुक केलेतसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक प्रो. डॉएसआय. उन्हाळे,  विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक प्रो. डॉएसआय. उन्हाळे यांनी केले.  प्रा. डॉ. आर. व्ही. येवले प्रा. ए. व्ही. पाटील आणि प्रा. डॉ. गीतिका तंवर यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.    

 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image