भारतातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना केले अभिवादन!;शुभांगी घरत यांची शिवरायांच्या मंदिरासाठी एक लाखाची देणगी

भारतातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना केले अभिवादन!;शुभांगी घरत यांची शिवरायांच्या मंदिरासाठी एक लाखाची देणगी



उरण दि १८(प्रतिनिधी)अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नितांतसुंदर असे भारतातील पहिलेच गणले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील हे पहिले मंदिर (शक्तिपीठ) भव्यदिव्य आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने खुलून दिसतेय. शिवरायांची मूर्ती डोळ्यांचे पारणे भेडणारी आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. १७) झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना अभिवादन केले. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डाॅ. राजूभाऊ चौधरी यांनी महेंद्रशेठ घरत आणि राजू कोळी यांचा शिवरायांच्या  मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार केला. शुभांगी महेंद्र घरत यांनी मंदिरासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. शिवरायांचे भव्य मंदिर आणि ऐतिहासिक मांडणी, कलाकुसर, तैलचित्रे पाहून महेंद्रशेठ घरत यांनी आनंद व्यक्त केला आणि मंदिराचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांचे अभिनंदन केले. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाप्रमुख दयानंद चोरघे, मनोज कोळी आदी उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image