रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून जिज्ञासा कडूला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून जिज्ञासा कडूला उच्च शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत 



पनवेल(प्रतिनिधी)  वैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल येथील जिज्ञासा कडू हिला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जिज्ञासाला सुपूर्द करण्यात आले.   
       सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. जिज्ञासाने  एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले असून ती पुढील वैद्यकीय शिक्षण सांगलीमधील प्रकाश इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँन्ड रिसर्च येथे 'मास्टर ऑफ सर्जरी' हे शिक्षण घेणार आहे. त्यासाठी तिला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार तिला मदत करण्यात आली असून मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जिज्ञासाचे अभिनंदन करुन तीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिचे वडील ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, आई भारती कडू, ऍड. परेश गायकवाड, मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते. 

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image