तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

 तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी 



उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
श्रीमंत योगी प्रतिष्ठान वशेणी,केळवणे,तांबडशेत यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगड ते तांबडशेत,वशेणी,केळवणे अशी महाराजांची शिवज्योत ह्या तिन्ही गावात मोठ्या उत्साहात आणण्यात आली. ही शिवज्योत आणण्यासाठी वशेणी गावचे शिवभक्त सुबोध पाटील, तांबडशेतचे कल्पेश म्हात्रे, संकेत पाटील,जयेश पाटील,केळवणेचे रंजित पाटील, गुरुनाथ गावंड, चैतन्य पाटील आदी शिवभक्तांनी ही शिवज्योत आनण्यासाठी खूप प्रयत्न केले.या शिवज्योतीचे प्रत्येक गावागावात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीथी प्रमाणे दिनांक १७/०३/२०२५ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.अशी माहिती पुनाडे गावचे शिवप्रेमी तथा पुनाडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील यांनी दिली.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image