पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल महानगरपालिकेत ‘लोकशाही दिन’ निमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

पनवेल दि.03 : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये आज दिनांक 03 मार्च रोजी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादवाढीसाठी महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी एकुण सात अर्ज प्राप्त झाले, त्यावर कारवाई करण्याचे संबंधित विभागांना आदेश देण्यात आले. 

यावेळी सर्वश्री  उपायुक्त कैलास गावडे, डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे,  शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे ,लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,सहाय्यक आयुक्त सर्वश्री  स्मिता काळे,  डॉ.रूपाली माने, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर , सामान्य  प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

चौकट

महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवस आधी द्यावेत. संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनादिवशी उपस्थित रहावे.