शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

 . शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट 

 

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुल हे शिक्षण प्रदान करणारे प्रख्यात शैक्षणिक संस्थान असून, येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून स्कुलचे चेअरमन परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयातील इयत्ता सातवी आणि आठवीच्या ५८ विद्यार्थी व ०४  शिक्षकांच्या समूहाने महाराष्ट्र  विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन व ग्रंथालयास भेट दिली. 
      या भेटीदरम्यान स्कुलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अधिवेशन पाहण्याचा लाभ देण्यात आला ज्यातून विद्यार्थ्यांना कामकाजबद्दल तसेच विधान भवन वास्तू विविध मंत्री दालने त्यांचे कक्ष यांची माहिती देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना लाभला. त्यामुळे भावी पिढीला अत्यंत अभ्यासपूर्ण अशा कार्याचा लाभ घेता आला असून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, उपशिक्षक हर्षल फडके, उपशिक्षिका मनिषा मोरे आणि नेहा ठाकूर, उमेश पोद्दार आदी उपस्थित होते. 

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image