बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनला पाठिंबा , पनवेल मध्ये बौद्ध समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा
पनवेल दि १८ प्रतिनिधी
बिहार येथील बुद्धगया हे भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे. जगभरातील बौद्ध आपल्या आयुष्यात एकदा बुद्धगयेच्या महाबोधी विहाराला भेट देतात. महाबुद्ध विहार हे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झाले आहे. मात्र या विहारावर बौद्धेतरांचे वर्चस्व असून सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या महाबोधी महाविहाराचे स्वामित्व आणि व्यवस्थापन बिहार सरकारने काळा कायदा करून बळकावल्यामुळे भारतातील समस्त बौद्धांनी याचा निषेध केला आहे. महाबोधी टेम्पल ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी भिक्खू संघाने बुद्धगया येथे भव्य आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच बौद्ध टेम्पल ऍक्ट रद्द करावा यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय असा मोर्चा शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी पवन चांडक यांना निवेदन देण्यात आले .
बिहार मधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासून विहार असताना देखील त्याचा ताबा मात्र बौद्धेतर विशेषता ब्राह्मणी धर्मपंडितांकडे आहे. ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित असावे असा संविधानीक अधिकार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून व्यापक लढा देखील सुरु आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील सर्वच बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवाच्या वतीने आज मोर्चा यामध्ये बौद्ध समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक ,चळवळीतील पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता यावेळी रिपाई जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड,पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे ,जेष्ठ पत्रकार तथा जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे, मुलगंध कुटी विहार ट्रस्ट चे अध्यक्ष दिनेश जाधव ,भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड,परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड ,माजी नगरसेविका विद्या गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार ,एकनाथ गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे महेंद्र मोरे, कोमोठे रिपाई शहर अध्यक्ष मंगेश धिवार, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके
रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार , प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोंढे ,गौतम पाटेकर नरेंद्र गायकवाड ,संदीप भालेराव , मिलिंद कांबळे सुरेंद्र सोरटे ,अनुराधा कीर्तने ,शारदा शिरोळे ,नलिनी भाटकर ,भारती कांबळे ,अनिता दिनेश जाधव सामाजिक कार्यकर्त्या अनघा भातनकर,राज सदावर्ते , कामगार नेते अनिल जाधव ,राहुल गायकवाड ,राजेश खंडागळे ,रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव , आदींसह धार्मिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील ,शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू ,काँग्रेस चे नेते सुदाम पाटील यांनी हि या मोर्चाला उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा असल्याचे सांगितले