नेरूळ विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

 नेरूळ विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


 

          नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त(2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

        नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत श्री.जितेंद्र वसंत कापसे, एनएल-बी- 85/08, से. 10 , नेरूळ, नवी मुंबई., मनिष बी गुप्ता/ सतिष बी गुप्ता एनएल-बी-85/08, से. 10 , नेरूळ, नवी मुंबई. व श्री.महेश वसंत वाईगवार, एनएल-1बी-85/9, से. 10 , नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे 3.75 मी X 7.70 मी मोजमापाचे G+4 आर.सी. सी. चे अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनधिकृत बांधकामधारकांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि. 17/02/2025 व 03/03/2025 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापी नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.

     नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत अनधिकृत बांधकाम निष्कासन मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे, कनिष्ठ अभियंता श्री. संजय सोनटक्के व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 10 मजुर, 2 ब्रेकर व 1 गॅसकटरच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

         यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.