मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रेंना समाजदर्पण पुरस्कार २०२५ "सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव"

 मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रेंना समाजदर्पण पुरस्कार २०२५

"सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव"




 पनवेल :       पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष, जे.एम.म्हात्रे इन्फा प्रा. लि. चेअरमन, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक, सिडकोचे माजी संचालक आणि रयत शिक्षण संस्था आदी विविध संस्थांवर कार्यरत असताना त्यांनी समाजहिताला प्रथम प्राधान्य दिलेत. पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्याला प्राधान्य दिले. त्याच बरोबर जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांना प्राधान्य दिले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना "समाज दर्पण पुरस्कार २०२५" देऊन गौरविण्यात आले.
         समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार घेऊन पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष श्री.जे एम म्हात्रे यांनी लोकसेवेची कास धरली. जात-धर्म-पंत वर्ण-वंश यापलीकडे जाऊन माणुसकीच्या धर्माला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलेत. पनवेलच्या विकासात आपले महत्वपूर्ण योगदान आहे. बंदिस्त मच्छी मार्केट, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक सभागृह अशा अनेक वास्तूंच्या रूपाने आपल्या कार्यकाळात त्यांनी पनवेलकरांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे. तत्कालीन शासनाकडून देण्यात आलेला पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष हा 'किताब आपल्या लोककार्याचा दाखला आहे. 
         सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा आणि राजकीय क्षेत्रासाठी त्यांनी दिलेली आयुष्याची ४० हुन अधिक वर्ष समाजाच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच दिशा देणारी आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जाळे निर्माण केले. 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क घेऊन आज इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा दिली जाते. 
          समाजासाठीच त्याचं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सिहांचा वाटा आहे. मोफत ई पास, लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन मोफत मध्ये नोंदणी करून मिळण्यास सहाय्य, गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटल मधील बेडची अपडेट माहिती मिळण्यास सहकार्य, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलमध्ये जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नसेवा, पनवेल अंतर्गत रुग्णांसाठी मोफत अम्ब्युलन्स सेवा, खांदा कॉलनी मधील कोवीड लसीकरण केंद्र बाबतीत विशेष माहिती, स्वस्त धान्य दुकानावर शासनाकडून मंजूर झालेले धान्य न मिळाल्यास त्या तक्रारीची त्वरित दखल, सरकारी योजना कार्यान्वित करणे, महिला रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध उपक्रम, नवोदित खेळाडूंना विविध प्रकारे प्रोत्साहन, समाजात विशेष प्राविण्य मिळवलेल्या सत्कारमूर्तींचा नेहमीच सन्मान अशा विविध प्रकारच्या कार्यात  त्यांच्या संस्थेचे महत्वपूर्ण योगदान आहे.
         याप्रसंगी आमदार श्री.प्रशांत ठाकूर,पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री जे.एम.म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत, प.म.पा. मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, मा.उपनगराध्यक्ष श्री.गणेश पाटील, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, मा. नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज आणि कोकण दर्पण मीडिया ग्रुप चे पदाधिकारी आणि सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
        
कोट
माझ्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे सामाजिक कार्य करत आलो त्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी बाबांचे अभिनंदन करतो आणि कोकण दर्पण यांना धन्यवाद देतो. अशा प्रकारे मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. 
प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा.विरोधी पक्षनेते 
पनवेल महानगरपालिका