शिवकालीन वंशज्यांच्या साक्षीने केळवणे गावात शिवस्मारक लोकार्पण सोहळा संपन्न

 शिवकालीन वंशज्यांच्या साक्षीने केळवणे गावात शिवस्मारक लोकार्पण सोहळा संपन्न






उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
 अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती , जगाच्या पाठीवर प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, आदर सन्मान आणि जल्लोषाने, साजरी केली जाते.
पनवेल तालुक्यातील सर्वात मोठ्या  केळवणे गावात शिवप्रेमाने प्रेरित होऊन अनेक ग्रुप आणि समूह तर्फे शिवरायांच्या तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे दोन्हीही शिवजयंत्या मोठ्या हर्ष जल्लोषाने साजरी केली जाते.तसेच या दिवसात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवतात.  २०२५ च्या यावर्षीच्या शिवजयंतीचे औचित्य साधून  केळवणे गावातील ट्रेकर्स ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या १२ व्या थेट वंशज  डॉ .शितल ताई शिवराज मालुसरे, बांदल घराण्याचे वंशज श्री. अनिकेत राजे बांदल व हिरोजी इंदलकरांचे वंशज श्री श्रीनिवास इंदलकर उपस्थित होते. शिवव्याख्याते ॲड विवेक भोपी व कार्यक्रमाचा प्रमुख भाग रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी मराठ मोळे पोवाडे सादर केले. तसेच या कार्यक्रमास   रायगड राज्याभिषेक पुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.
ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात डोळ्याचे पारणे फिटावे असा हा नेत्रदीपक सोहळा केळवणे गावातील संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि कार्यक्रमास आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अनुभवली. या कार्यक्रमाचे सर्वत्र चर्चा होऊन सर्वांचे कौतुक होत आहे.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image