चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,न्यू पनवेल (स्वायत्त) येथील तृतीय वर्ष , वाणिज्य (लेखा व वित्त) विद्यार्थ्यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लाईव्ह टर्मिनल- शैक्षणिक भेट

चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,न्यू पनवेल (स्वायत्त) येथील तृतीय वर्ष , वाणिज्य (लेखा व वित्त) विद्यार्थ्यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लाईव्ह टर्मिनल- शैक्षणिक भेट


मुंबई/प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालया तर्फे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी तृतीय वर्ष , वाणिज्य (लेखा व वित्त) विद्यार्थ्यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लाईव्ह टर्मिनल अभ्यासा साठी, फिरोज जीजीभॉय टॉवर्स, दलाल स्ट्रीट , काळा घोडा, फोर्ट, मुंबई, येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. याचे नियोजन डॉ. निलेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मनोज सुपेकर यांनी केले होते.

या शैक्षणिक भेटीचे मूळ उद्दिष्ठ असे होते कि, विद्यार्थ्यांना शेअर मार्केट, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील गुंतवणूक समजून घेता येईल, स्टॉक मार्केट ऑपरेशन, डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि मूलभूत विश्लेषणाचे ज्ञान घेता येईल तसेच शेअर बाजारातील व्यापार कौशल्य समजून घेता येईल व स्टॉक मार्केटच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करता येईल.

या शैक्षणिक भेटीसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज फोरमचे, वित्त आणि ऑपरेशन्सचे प्रमुख मा. युनूस कुरेशी लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केट, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट याबद्दल सविस्तर माहिती दिली.

या शैक्षणिक भेटीसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यामध्ये एकूण १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शीवला. हि शैक्षणिक भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लेखा व वित्त विभाग, प्रमुख प्रा. डॉ. निलेश कोळी, प्रा. मनोज सुपेकर, प्रा. अलोक भानुशाली आणि प्रा. मोनिका भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image