शिरढोण येथे क्रांतीज्योतीचे आयोजन
पनवेल : क्रांतिज्योत मित्र मंडळ, शिरढोण यांच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी आयोजित करण्यात आला होता. सालाबाद प्रमाणे क्रांतिज्योतीचे आयोजन करण्यात आले होते . क्रांतिज्योतीचे हे ३९ वे वर्ष आहे.
कलावंतीन माची प्रबळगड येथुन ज्योत प्रज्वलीत करून सायंकाळी ४ वा. शिरढोण स्मारकामध्ये आगमन झाले. भव्य मिरवणूकीने स्वागत उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले. यावेळी श्री. गणेश नाईक (राज्याचे वनमंत्री), प्रशांत ठाकूर (आमदार पनवेल), जे. एम. म्हात्रे (मा. आदर्श नगराध्यक्ष), पनवेल पालिका मा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, श्री. गणेश कडू (मा. नगरसेवक), श्री. सुनील घरत (मा. नगराध्यक्ष), श्री. महेंद्र घरत (कामगार नेता), सौ. वैशाली भोईर (सरपंच), सौ. नेहा महाडिक (उपसरपंच) व ग्रामस्थ मंडळ शिरढोण उपस्थित होते.