गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

 गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित


 पनवेल : यशवंतराव चव्हाण सेंटर, नवी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कार 2025 यावर्षी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख आणि संस्थेचे सचिव जगदीश जाधव उपस्थित होते. 
         यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्राच्या विद्यमाने शनिवार 22 फेब्रुवारी रोजी नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात अनाथ आणि आदिवासी मुलांच्या सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अनाथ आणि आदिवासी मुलांच्या सक्षमीकरणात श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विविध स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image