श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त गोर गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप

 श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त गोर गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप 



उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. १९ फेब्रुवारी अर्थातच शिवजयंती. या शिवजयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील करळ फाटा येथे झोपडपट्टीतील गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट (गरम चादरी )चे वाटप करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सल्लागार महेश पाटील, चिटणीस अभय पाटील, सोशल मीडिया प्रमुख साहिल म्हात्रे,सह संपर्क प्रमुख सादिक शेख,सदस्य नितेश पवार, सागर घरत, विजय कोळी,भाविक पाटील,आर्यन पाटील, अर्णव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ब्लॅंकेटचे वाटप केल्याने गरजू व्यक्तींनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक लहान मोठे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. संस्थेच्या सर्वच उपक्रमांना जनतेचा नेहमी उत्तम प्रतिसाद लाभल्याचे यावेळी अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगितले.
Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image