संगीत सभेत रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी केले रसिकांना मंत्रमुग्ध

संगीत सभेत रायगडचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनी केले रसिकांना मंत्रमुग्ध 



पनवेल (प्रतिनिधी) जगविख्यात तबलावादक पंडित सदाशिव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सदाशिव अकॅडमी ऑफ म्युझिक यांच्यावतीने संपन्न झालेल्या एक दिवसीय संगीत सभेत रायगडचे सुपूत्र पं. उमेश चौधरी यांनी आपल्या गायन कलेतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या समारंभाला रसिकांचा उत्स्फूर्त लाभला. हा कार्यक्रम अत्यंत सुरेल आणि भक्तिरसात न्हाहून गेला होता. 
         डोंबिवली येथील गणपती मंदिर वक्रतुंड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. पं. सदाशिव पवार यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या हाती कार्यक्रमाची सूत्र देण्यात आली. त्यांनी 'राग पुरिया धनाश्री'  मधील बडा खयाल लयकारी अंगाने सुसूत्रप्रमाणे राग विस्तारित केला. त्यानंतर छोटा खयाल व तराणा विशेष तयारीने पेश केला. व मैफलीच्या शेवटी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या 'आता कोठे धावे मन' हा प्रसिद्ध अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवत त्यांची मने जिंकली. 
        या मैफिली नंतर रसिकांना टाळी धरण्यास भाग पाडले ते म्हणजे पं. रूपक पवार यांच्या तबला सोलो वादनाने. त्यांनी ताल तीनतालमध्ये उस्ताद जाकीर हुसेन यांच्या काही बंदिशी सादर करून त्यांनीही श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यांना लेहरा साथ विनोद पडघे यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ गायिका डॉ. पौर्णिमा धुमाळ यांनी राग 'दुर्गा' मधील बडा आणि छोटा खयाल व राग 'बसंत' मधील "फगवा ब्रिज देखन" हा छोटा खयाल सादर करीत " ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू" हा सेनामहाराजांचा अभंग गाऊन श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले. नित्यक्रमाला तबल्यावर पं. निषाद पवार व पं. विनायक नाईक तर हार्मोनियमवर मंदार दीक्षित यांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचान नीता रामतीर्थे यांनी तर ध्वनी मुद्रण सुनील म्हात्रे यांच्या अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओने केले. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image