सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर वर्षभरात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर, ‘रयत’चे रायगड विभागीय निरीक्षक मोहन कोंगरे, सहाय्यक निरीक्षक भानूदास खटावकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, उपस्थित होते. मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची थीम मूल्योत्सव अशी होती. या अंतर्गत शैक्षणिक मूल्ये, शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, स्वच्छतेचे महत्त्व, शाळेविषयी प्रेम, स्त्री-पुरुष समानता, मोठ्यांचा आदर, ध्येयनिश्चिती अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली. शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये विविध विषयांत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी; त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात, वक्तृत्व स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावणार्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तर विशेष स्पर्धेत सहभागी झालेल्या पालकांचेही कौतुक केले गेले.