अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड

अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड

पनवेल दि.(१५(वार्ताहर): तळोजा परिसरात अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड करून मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत केला आहे. 

  तळोजा पोलीस  ठाणे हद्दीतील पाले खुर्द येथील इसम विकास नारायण दुर्गे ( वय 50 वर्षे) हा त्याचे स्वतःचे मालकी जागेत अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करत असल्याची माहीत तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी १४०७ सिलेंडर मिळून आले असून त्यापैकी ४३८ भरलेले सिलेंडर व ९६९ रिकामे सिलेंडर मिळून आले आहेत. सदर इसमाकडे सिलेंडर गॅस विक्रीचे व साठवणूक करण्याचे कोणतेही कागदपत्रे नाहीत. सदर ठिकाणी विकास दुर्गे याचेसह बबलू पवार, (51 वर्षे  वाहन चालक) व लखन जाधव (23 वर्षे हे काम पाहत होते. सदर इसम हा विष्णू भारत गॅस, पनवेल येथून दररोज 80 सिलेंडर 14 किलोग्रॅम वजनाचे 803 रुपये प्रति सिलेंडर दराने व वरद विनायक एचपी गॅस, कळंबोली येथून 1 दिवसाआड 48 सिलेंडर 14 किलोग्रॅम वजनाचे 825 रुपये प्रति सिलेंडर दराने ब्लॅकने खरेदी करत आहे. तसेच दर 3 दिवसाने 234 सिलेंडर 19 किलोग्रॅम वजनाचे सिलेंडर बीपीसीएल उरण येथून फ्रेंडस भारत गॅस, घणसोली यांचे नावाने खरेदी करायचा. हे सिलेंडर वाहतूक करण्याकरिता विकास दुर्गे याच्याकडे आयशर टेम्पो, महिंद्रा पिकप तसेच टाटा छोटा हत्ती अशी तीन वाहने आहेत. या घटनास्थळावरून गॅस सिलेंडर रिफिलिंग करण्याचे सामग्री देखील मिळून आली आहे. सदर इसम हा चिंध्रन, पालेखुर्द, वावंजे, कुत्तरपाडा, देवीचापाडा, पाटीलवाडी येथील हॉटेल, दुकानदार, काही घरगुती यांना सिलेंडर विक्री करत असल्याची माहीत मिळाली आहे. या त्रिकुटाच्याटकेमुळे अवैध धंद्यांना आळा बसणार असल्याची माहिती वपोनि प्रवीण भगत यांनी दिली. 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image