जागतिक पाणथळ दिवसानिमित्त टीएस चाणक्यमागील सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम

 जागतिक पाणथळ दिवसानिमित्त टीएस चाणक्यमागील सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम


          आज 2 फेब्रुवारी रोजीच्या जागतिक पाणथळ दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका व इन्व्हायरमेंट लाईफ (मँग्रुव्हज सोल्जर) आणि सेव्ह नवी मुंबई या दोन पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने बेलापूर विभागात टी एस चाणक्य पाठीमागील सागरी किनारा या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
          महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
          या मोहिमेमध्ये परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता श्री. राजेश पवार, स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक श्री विजय नाईक यांच्यासह इन्व्हायरमेंट लाइफचे प्रमुख श्री. धर्मेश बराई, सेव्ह नवी मुंबईचे प्रमुख श्री. सुनील अग्रवाल व श्रीम. श्रुती अग्रवाल, श्री.डी.के. जैन, श्री. राहुल रासकर, नील सिद्धी ग्रुपचे प्रमुख कल्पेश पालन आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
          नवी मुंबई महानगरपालिका आयोजित करीत असलेल्या स्वच्छता मोहिमांना युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभ होत असून आजच्याही स्वच्छता मोहिमेत एसआयईएस महाविद्यालय नेरुळ, एससीओई महाविद्यालय खारघर आणि केबीपी महाविद्यालय व डीएलएलई DLLE गटाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता.
          या विशेष मोहिमेअंतर्गत पाणथळ जागांमधून 100 हून अधिक गोणी कचरा काढून टाकण्यात आला. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, एकल वापर प्लास्टिकचे प्रमाण अधिक होते. या मोहिमेद्वारे पाणथळ जागांच्या स्वच्छतेच्या माध्यमातून स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. ही मोहीम यशस्वीरित्या व योग्य पद्धतीने राबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
           सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आयोजित या विशेष स्वच्छता मोहिमेत शंभरहून अधिक पर्यावरण प्रेमी विद्यार्थी व नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. सीवूड्स येथील श्री बामनदेव अंडरपासजवळील मैदानावर सर्वांनी एकत्र येऊन प्लास्टिक बंदी व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सामुहिक शपथ घेतली. यावेळी कापडी पिशव्यांंचे  वाटप करण्यात आले.




Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image