शिवजयंती निमित्त भाजपच्यावतीने मराठा वेशभूषा स्पर्धा
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी असून स्पर्धेला शहरातील गावदेवी मंदिरापासून सकाळी ७. ३० वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मयुरेश नेतकर ९८२१५३१५४७, सुमित झुंझारराव ९८३३३४९१९७, देवांशू प्रभाळे ८४३३५१३५४० किंवा प्रशांत शेट्ये ९३२४७१७१११ यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.