पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
पनवेल प्रतिनिधी
थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची 24 डिसेंबर रोजी शतकोत्तर रोप्यमहोत्सव जयंती वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला ,यामध्ये ,गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
परेल मुंबई येथील एम डी कॉलेज च्या सभागृभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर सर उपस्तिथ होते . सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती ( महाराष्ट्र राज्य),च्या वतीने विशेष उल्लेखनिय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती बाबतचा विचारांची उजळणी करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निलेश सोनावणे हे गेली २३ वर्षे पत्रकार क्षेत्रात असून गेली १६ वर्षे पनवेल युवा हे वर्तमानपत्र चालिवत समाजातील पीडित वंचितांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपला हक्क अधिकार मिळवुन देण्याचे काम करीत आहेत . डॉ बाबासाहेब आंबेडकर ,चळवळीत कार्यकर्ते आहेत गेली अनेक वर्षे ते छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,महात्मा जोतिबा फुले ,सावित्रीबाई फुले ,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून दलित आदिवासी ,गरजू लोकांसाठी काम करीत आहेत. जेथे कोण पाहोचून मदत ,सामाजिक काम करीत नाहीत अशा दुर्गम भागात जाऊन दे समजासेवा करीत असतात , पर्यावरणातील समतोल राहावा या करीता दर वर्षी वृक्ष लागवडीचा संकल्प ते करीत आहेत आत्तापर्यंत हजारो झाडे लावून ती जगवली आहेत .पर्यावरणसह ,कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जंपण्यासाठी ते काम करीत आहेत ,अनेक सामाजिक संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत .लोकशक्ती संजीवनी प्रतिष्टान महाराष्ट्र या संस्थेचे ते राष्टीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत विविध धार्मिक संघटनाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे गेली सात वर्ष सलग ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ,त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भीम महोत्सव समितीने त्यांना या वर्षी भीमरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे .या अगोदर पनवेल भूषण ,डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार ,वामनदादा कर्डक उत्कृष्ट लेखक पुरस्कार या सह बौद्ध समाजाची शिखर संस्था असलेल्या भारतीय बौद्ध महासभेने त्यांना पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे .जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत पंचवीस ते तीस पुरस्काराने त्यांना आतापर्यंत विविध संस्थांनी त्यांना गौरविले आहे .कोरोना सारख्या जागतिक लाटेत त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची सेवा केल्याने माजी आमदार दत्तू शेत पाटील शिक्षण प्रसारक मंडळाने कोरोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याबाबद्दल सामाजिक ,धार्मिक शैक्षणिक ,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांकडून निलेश सोनावणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .