पनवेल महानगरपालिकेत विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न, सर्व कामे जलदगतीने पूर्ण करा-आयुक्त मंगेश चितळे
पनवेल,दि.24: पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा विभागवार आढावा आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मुख्यालयात झालेल्या बैठकित आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी घेतला. यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचन संबधित विभागास दिल्या.
या आढावा बैठकीत बांधकाम विभागाच्यावतीने महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगती बाबत माहिती घेण्यात आली. तसेच नव्याने होऊ घातलेले महापालिका हद्दीतील कामे जसे की सर्व स्मशानभूमी सुधारणा ,विविध ठिकाणच्या शाळा बांधणे, दुरूस्ती करणे, हिरकणी रूग्णालय या कामाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी शौचालय उभारण्यास्तव जागेची पाहणी करण्याबाबत आरोग्य विभागास सूचना दिल्या. तसेच अग्निशमन विभाग, नगररचना, दिव्यांग,पाणीपुरवठा, विद्युत विभागाच्या विविध कामांचा आढावा घेऊन त्यावरती यावेळी चर्चा करण्यात आली.
तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर लावताना त्यावरती क्यू आर कोड लावणे बंधनकारक आहे. ज्या होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनरवरती क्यू आर कोड नाहीत असे होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनरवरती तात्काळ तोडक कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे , उपायुक्त डॉ.वैभव विधाते,उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सहाय्यक संचालक केशव शिंदे ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण ,मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.