मराठा वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 




पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा वेशभूषा स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी होती.  या स्पर्धेत ५० हुन अधिकांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे भावी युवा पिढीमध्ये इतिहासाची जागृती आणि मराठा संस्कृती अधोरेखित झाली. स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मराठा वेशभूषेप्रती असलेल्या आकर्षणाचे आणि अभिमानाचा प्रतीक ठरला.
       या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत शेट्ये, चिन्मय समेळ, कोमल कोळी यांच्यासह अनेक शिवप्रेमींची उपस्थिती लाभली.   
       मराठा वेशभूषा ही मराठा साम्राज्यातील पारंपरिक पोशाख आणि परंपरांचे प्रतीक आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांचीही वेशभूषा त्याकाळच्या संस्कृती, सामाजिक स्थान, आणि युद्ध परंपरानुसार ठरलेली होती. मराठा वेशभूषा ही केवळ सौंदर्यदर्शक नव्हती, तर ती त्यांच्या जीवनशैली, पराक्रम आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्या अनुषंगाने मराठा वेशभूषा स्पर्धा हा पारंपरिकतेचा आणि मराठा संस्कृतीचा गौरव करणारा विशेष उपक्रम ठरला आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी पारंपरिक मराठा पोशाख परिधान करून इतिहासातील विविध व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले. १५ वर्षाखालील मुलामुलींनी आपल्या सुप्तगुणांचे दर्शन घडवत शिवजयंतीचा उत्सव उत्साहात साजरा केला. त्यानुसार या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image