कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकाराने कामगारांना मोठा दिलासा

 कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकाराने कामगारांना मोठा दिलासा 


म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनची बैठक यशस्वी; बेमुदत उपोषण तूर्त स्थगित!

पनवेल(प्रतिनिधी) कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत पनवेल महानगरपालिकेच्या कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून सकारात्मक तोडगा निघाल्याने दिनांक १८ फेब्रुवारी पासून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने पुकारलेला बेमुदत उपोषण तूर्त स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली. 
       महापालिकेतील कामगारांच्या संदर्भात युनियनने पालिकेकडे मागण्या सादर केल्या होत्या. व त्या अनुषंगाने चर्चेची अपेक्षा व्यक्त केली परंतू चर्चा न झाल्याने म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अँड सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८  फेबुवारीपासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची हाक दिली होती. या संदर्भात पनवेल महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी शुक्रवार दि. १५ फेब्रुवारीला चर्चा केली होती. कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष देत आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संवाद करत कामगारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीची सूचना केली होती. त्यानुसार १७ फेब्रुवारीला आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर चांगल्याप्रकारे चर्चा होऊन चर्चेनंतर कामगार हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने पेशन्स योजना, वारस व अनुकंपा प्रकरणे, सेवा जेष्ठता प्रमाणे यादी नव्याने एकच यादी प्रसिध्द करून जेष्ठतेनुसार पदोन्नती,  गणवेश वाटप व पावसाळी प्रावरणे वेळेत देण्यात येणार, कामगार कर्मचारी व अधिकारी ,सेवानिवृत्तीधारक यांना दहा लाख रूपयांची कॅशलेश मेडिकल पॉलिसी, ग्रामपंचायत कालिन समावेशन कामगारांना महानगरपालिका स्थापनेच्या दिनांकापासून (१ ऑक्टोबर २०१६) सेवा सुविधा देणे बाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली तसेच कंत्राटी कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यात येईल, आश्वासित प्रगती योजना लागू करून फरकासह अंमलबजावणी येत्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी करण्यात येईल असे बैठकीत ठरले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, आस्थापन विभाग प्रमुख दिपक सिलकन,  योगेश्वर पाटील तर संघटनेकडून कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, कोषाध्यक्ष दत्तगुरु म्हात्रे, विभागीय अध्यक्ष शैलेश गायकवाड  जेष्ठ प्रतिनिधी अंनता पाटील, विश्राम म्हात्रे, हरेश कांबळे, रामा भोईते, निलेश म्हात्रे, राकेश परदेशी, निलेश जोमा म्हात्रे, विशाल गायकवाड, शांताराम म्हात्रे, कांतिलाल  शेळके, प्रविण भोईर, जीवन भेंडे, आकाश केणी, रविंद्र जाधव, विजय गावडे, रोशन चिमणे, प्रफ्फुल भगत, सचिन पाटील आदी उपस्थित होते.