पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी



पनवेल/प्रतिनिधी, दि. २

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, आर. के. नायर, शिवाजी भोसले, अशोक आंबेकर, जरीना शेख, कविता गुप्ता, रविंद्र फास्टे उपस्थित होते. पनवेल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत केला जात आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पनवेल स्थानकाचा विकास या योजनेचा एक भाग असून प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी करत सुचनाही संबधित अधिकाऱ्यांना केल्या. 


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image