डेब्रिज प्रतिबंधात्मक आणि एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाया

डेब्रिज प्रतिबंधात्मक आणि एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाया


 

नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ 2 च्या डेब्रिज विरोधी पथकाने धडक कारवाई करीत आज लागोपाठ दुस-या दिवशी घणसोली येथे मोकळ्या दुर्लक्षित जागेवर डेब्रिज टाकणा-या वाहनावर वाहन जप्तीची धडक कारवाई केली. त्या वाहन मालकाकडून 15 हजार रक्कमेची दंडवसूली करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार. परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली असून डेब्रिज विरोधी कारवाया तीव्र करण्यात आलेल्या आहेत.

अशाच प्रकारे परिमंडळ 2 च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाने कोपरखैरणे सेक्टर 6 परिसरातील व्यावसायिक दुकानांची तपासणी केली असता कन्नन इडली यांचेकडे प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळल्याने सदर 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडून नियमानुसार रू. 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासोबतच शहर स्वच्छतेला बाधा पोहचविणा-या घटकांविरोधात कारवाई करण्यात येत असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवरही भर देण्यात येत आहे.