सरपंच चषक 2025 चे आयोजन, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती

 सरपंच चषक 2025 चे आयोजन, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती




उरण : जासई ग्रुप  ग्रामपंचायतचे थेट सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबा क्रिकेट क्लब,जासई यांनी “सरपंच चषक-२०२५” चे आयोजन केले होते. या सामन्याना शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट देऊन श्री.संतोष घरत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सरपंच कसा असावा याचे एक आदर्श उदाहरण म्हणजेच श्री.संतोष घरत. ग्रामपंचायत मध्ये पारदर्शक आणि विकासात्मक कारभार करण्यामध्ये त्यांचा नेहमीच कल असतो.
        साई गणेश मित्र मंडळ, गव्हाण यांच्या माध्यमातून महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती आयोजित “साई गणेश चषक-२०२५” आयोजन करण्यात आले होते. पाटणे मैदान, गव्हाण कोळीवाडा येथे या भव्य प्रकाश झोतातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित  करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून मर्यादित क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेतला. 
        आपण ज्या गावात मोठे झालो त्याच गावात प्रमुख पाहुणे म्हणून आपण जातो त्यावेळी मनात एक उत्साह असतो. दोन्ही ठिकाणी सामन्यांचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्तम रित्या केले होते त्याबद्दल खंडोबा क्रिकेट क्लब,जासई आणि साई गणेश मित्र मंडळाचे अभिनंदन करून उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
       यावेळी श्री. नरेश शेठ घरत, श्री. सचिन घरत, श्री. माणिकशेठ म्हात्रे, श्री. सतीश शेठ घरत, श्री. हेमंत पाटील, श्री. गणेश पाटील, सौ.वीना घरत, श्री. रवी घरत, श्री. दत्ता घरत, श्री. संतोष आत्माराम घरत, श्री. मिलन घरत,श्री. समित पाटील, श्री. रामकिशोर ठाकूर, सौ. पुष्पा म्हात्रे, सौ. अश्विनी नाईक, सौ. जयश्री घरत, सौ. ऋतूजा घरत, सौ. पुजा कांबळे, सौ. सृष्टी म्हात्रे, सौ. निराबाई म्हात्रे, सौ. वंदना पाटील, सौ. योगिता म्हात्रे, श्री. किशोर कोळी, श्री. राजू कोळी, श्री. विशाल कोळी, श्री. अरुण पाटील उपस्थित होते.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image