प्रितमदादा चषक 2025” चे आयोजन

 प्रितमदादा चषक 2025” चे आयोजन


पनवेल : शेतकरी कामगार पक्ष चिरनेर च्या माध्यमातून “प्रितमदादा चषक 2025” चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून सामन्यांचे उद्घाटन केले. 
   शेतकरी कामगार पक्षाची नवीन तरुण पिढी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा पुढाकार घेत आहे हे पाहून प्रीतम म्हात्रे याना समाधान वाटले. याप्रसंगी म्हात्रे यांनी संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष चिरनेर च्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत श्री. सुरेश पाटील (सहचिटणीस शेकाप उरण), श्री. रमाकांत पाटील (मा. पं. स. सदस्य), सौ. शुभांगी ताई पाटील (मा. उपसभापती उरण), श्री. हरेंद्र गावंड (मा. उपसरपंच पिरकोन), श्री चंद्रशेखर पाटील (मा. सरपंच सारडे), श्री. अरुण पाटील, श्री. संजय पाटील, श्री. रविंद्र ठाकूर, श्री. भास्कर ठाकूर, श्री. संदिप गावंड, श्री. गोपीनाथ गोंधळी, श्री. सतीश पाटील, श्री. अनिल पवार उपस्थित होते.