रंग मराठी कलाकारांचा' संकल्पनेतून सीकेटी विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

'रंग मराठी कलाकारांचा' संकल्पनेतून सीकेटी विद्यालयाचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न 



पनवेल/प्रतिनिधी,दि.८


जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालयात 'रंग मराठी कलाकारांचा' हि संकल्पना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
        हा कार्यक्रम संस्थेचे कार्यकारणीसदस्य संजय भगत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई पूर्व विभागविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे उपनिरिक्षक भक्ति गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विदयालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची तसेच यावर्षी विदयालयाला जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' हा पुरस्कार प्राप्त झाला याचीही माहिती त्यांनी दिली. या विद्यालयातील विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गुणगौरव या सोहळ्यात करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थीनी 'रंग मराठी कलाकारांचा' या विषयाला अनुसरून  नयनरम्य नृत्याविष्कार उत्साहात सादर केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे सचिव एस.टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुभाष मानकर, नीलिमा शिंदे, पर्यवेक्षिका वैशाली पारधी, मुख्याध्यापककैलास सत्रे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.



Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image