एचएमपीव्ही विषाणूशी लढण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क

एचएमपीव्ही विषाणूशी लढण्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क

पनवेल,दि.9 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या अनुषंगाने आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार पनवेल महानगरपालिकेची आरोग्य यंत्राणा सतर्क झाली आहे. एचएमपीव्ही रूग्णांच्या उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात 20 राखीव खाटा तसेच एमजीएम रूग्णालयामध्ये 50 राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत. 

सध्या चीनमध्ये मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही)  याचा  उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच देशभरात देखील या विषाणूचे रूग्ण मिळू लागले असल्याने आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे पनवेल महानगरपालिका सज्ज झाली असून उपजिल्हा रूग्णालयात 20 राखीव खाटा तसेच एमजीएम रूग्णालयामध्ये 50 राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरज भासल्यास कळंबोलीतील जुन्या कोविड सेंटर येथे ऑक्सीजनयुक्त 60 खाटा सुरू करण्याबाबत महापालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.

याबरोबरच महापालिकेच्या 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी रूग्णालयांना एचएमपीव्ही साथरोगाची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती  राज्य शासनाच्या साथरोग सर्वेक्षण पोर्टलवर आद्ययावत करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहेत. तसेच वेळोवेळी महापालिकेच्यावतीने पिडीयाट्रिक टास्क फोर्स मार्फत मार्गदर्शन घेण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

चौकट

एचएमपीव्ही विषाणूशी लढण्यासाठी

हे करा :

1. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

4.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.


हे करू नये :

1.हस्तांदोलन

2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

3.आजारी लोकांशी जवळचा संपर्क

4. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.

5.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

Popular posts
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे उदघाटन
Image
दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक
Image
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार
Image
कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
Image