राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्यांची पनवेल महानगरपालिकेस सदिच्छा भेट : महापालिकेच्या कामाची केली प्रशंसा
पनवेल दि.18: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सन्मानीय सदस्य श्री.डॉ. पी.पी. वावा यांनी आज दिनांक 18 जानेवारी रोजी पनवेल महानगरपालिकेस सदिच्छा भेट देऊन महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता कार्याबाबत प्रशंसा केली. तसेच यावेळी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. पनवेल महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना देत असलेल्या सुविधांबाबत यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सामाजिक सल्लागार अभिषेक नाथ, समन्वय संदिप चरण, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, लेखाधिकारी संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखा परिक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंग टाक, संतोष चिंडालिया , सफाई कामगारांच्या संघटनेचे पदाधिकारी शैलेश गायकवाड, अनिल जाधव, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मागील डॉ.पी.पी.वावा यांनी दिलेल्या महापालिका भेटीत सफाई कर्मचा-यांना अधिकच्या सुविधा पुरविण्याबाबत केलेल्या मौलिक सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे यावेळी महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी सादरीकरणाव्दारे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याबरोबरच कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना त्यांची सर्व देयके त्याच दिवशी देत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
तसेच महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे सांगून त्रैमासिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करत असल्याचे घनकचरा व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते सांगितले. महापालिका उच्च शिक्षित आरोग्य निरीक्षकांना पालिकेने पदोन्नती देत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. महापालिकेने नुकतेच एका आरोग्य निरीक्षकाला कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त केले आहे. यावेळी या कनिष्ठ अभियंत्याचा श्री.डॉ. पी.पी. वावा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
एकुणच पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना देत असलेल्या सोयी सुविधाबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सन्मानीय सदस्य श्री.डॉ. पी.पी. वावा यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.