विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) आधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ५२ व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.
उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचवतीने ५२ व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शुक्रवार, दि. ०३) झाले. या प्रदर्शनानिमित्त उरण तालुक्यातील अनेक शासकीय तसेच निमशासकीय विद्यालयांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटशिक्षण अधिकारी संतोष सिंग डवेराव, गट शिक्षण अधिकारी प्रियांका म्हात्रे, गोपाळ जाधव, निर्मला घरत, शंकर म्हात्रे, बबन पाटील, विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, कमिटी मेंबर शेखर तांडेल, नरेश मोकाशी, विकास पाटील, प्रीतम वर्तक, बळीराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.