समाजसेवक निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने गौरव

 समाजसेवक निलेश सोनावणे यांचा भीमरत्न पुरस्कारने  गौरव



पनवेल प्रतिनिधी
पनवेल युवा याचे संपादक तथा  जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .वासुदेव बळवंत फडके  नाट्यगृहात आयोजित भीम महोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्याना जेष्ठ साहित्यिक ,कवी लेखक बबन  सरोदे यांच्या शुभहस्ते  सन्मानित करण्यात आले .
पनवेल तालुक्यातील भीम महोत्सव हा गेली सात  वर्षे भरवला जातो या महोत्सवात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो या वर्षी चा भीमरत्न पुरस्कार पनवेल युवा चे संपादक तथा जागृती फाऊंडेशन  चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांना देऊन गौरविण्यात आले ,निलेश सोनावणे  हे डॉ बाबासाहेब आंबेडकर ,चळवळीत कार्यकर्ते आहेत गेली अनेक वर्षे ते छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,महात्मा जोतिबा फुले ,सावित्रीबाई फुले ,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन  सामाजिक क्षेत्रात कार्य करीत  असून दलित आदिवासी ,गरजू लोकांसाठी काम करीत आहेत. जेथे कोण पाहोचून मदत ,सामाजिक काम  करीत नाहीत अशा दुर्गम भागात जाऊन दे समजासेवा करीत असतात , पर्यावरणातील समतोल राहावा  या करीता दर वर्षी वृक्ष लागवडीचा  संकल्प ते करीत आहेत आत्तापर्यंत हजारो झाडे लावून ती जगवली आहेत .पर्यावरणसह  ,कला क्रीडा सांस्कृतिक वारसा  जंपण्यासाठी ते काम करीत आहेत ,अनेक सामाजिक संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत  आहेत .लोकशक्ती संजीवनी प्रतिष्टान महाराष्ट्र या  संस्थेचे ते राष्टीय उपाध्यक्ष म्हणून काम  करीत आहेत विविध धार्मिक संघटनाचे ते प्रतिनिधित्व  करीत आहेत ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे गेली सात वर्ष सलग ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ,त्यांच्या  सामाजिक कार्याची दखल घेत भीम महोत्सव समितीने त्यांना या वर्षी भीमरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे .या अगोदर पनवेल भूषण ,डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार ,वामनदादा कर्डक उत्कृष्ट लेखक पुरस्कार या सह  बौद्ध  समाजाची शिखर संस्था असलेल्या भारतीय बौद्ध महासभेने त्यांना पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे .जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत पंचवीस ते तीस पुरस्काराने त्यांना आतापर्यंत विविध संस्थांनी त्यांना   गौरविले आहे . कोरोना सारख्या जागतिक लाटेत त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांची सेवा केल्याने  माजी आमदार दत्तू शेत पाटील शिक्षण प्रसारक मंडळाने कोरोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे . या कार्यक्रमात समाजातील कमलाकर गायकवाड,प्रकाश गायकवाड,विजय बाबरे,,सुदिन पाटील,संतोष आमले,यांनाही भीमरत्न  उरस्काराने सन्मानित करण्यात आले तर काळ क्षेत्रातील उल्लेखनीय काळ सादर करणाऱ्या  प्रशांत नाक्ती,सोनाली सोनवणे ,रितेश कांबळे ,बबन सरोदे,कांचन पगारे ,प्रबुद्ध जाधव,अमोल घोडके,विशाल म्हस्कर ,प्रशांत मोहिते,रवी जाधव यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी कलाकार दिग्दर्शक विशाल सावंत यांचा हि सत्कार करण्यात आला. 
    या कार्यक्रमास  बौद्धजन पंचायत समिती पनवेल तालुका अध्यक्ष विजय गायकवाड
 समाजसेवक तळोजे विभाग  कमलाकर कांबळे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा काशिनाथ कांबळे  बौद्धाचार्य हिरामण जोशी गुरुजी  पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष आरपीआय प्रभाकर कांबळे पनवेल तालुका अध्यक्ष आरपीआय  विजय पवार समाजसेवक मोहन गायकवाड  जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना रायगड  सुभाष गायकवाड ग्रामपंचायत सदस्य ओवळे राज सदावर्ते
उद्योजक जयवंत बाबरे  पोलीस पाटील करंजाडे कुणाल लोंढे भीम महोत्सव यशस्वी करण्यासाठी  समितीचे  राहुल गायकवाड,सुदेश जाधव,वैभव गवळी,सतीश गायकवाड,शुभम रुके,मुकुंद कांबळे,कुणाल खैरे,रोशन कासारे,केवळ गायकवाड,सुरेश मोहिते,अर्जुन चिंडालिया,सुनील गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.