जेएम म्हात्रे संस्थेच्या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

 जेएम म्हात्रे संस्थेच्या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन


 पनवेल : जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, कोळी समाज विद्या संकुलन, प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.२७) संपन्न झाला. मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी प्रास्ताविक, तर मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक रामनाथ कोळी यांनी भूषविले होते. कार्यक्रमाला जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तर व्यासपीठावर डॉ. प्रशांत पाटील, राजेंद्र कोळी, जयवंत मढवी, राजाराम पाटील, किरण शिंगटे, जविंद्र कोळी, दिलीप मुंबईकर, परशुराम कोळी आदीजण उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पारितोषकांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image