यंदाचा 'नमो चषक' भव्य-दिव्य स्वरूपात होणार - लोकनेते रामशेठ ठाकूर

 यंदाचा 'नमो चषक' भव्य-दिव्य स्वरूपात होणार - लोकनेते रामशेठ ठाकूर 




पनवेल (प्रतिनिधी) मागिल वर्षी नमो चषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याच अनुषंगाने यंदा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होईल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०६) उलवा नोड येथे व्यक्त केला. 
पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 'नमो चषक २०२५' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
          या बैठकीस पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व नमो चषकाचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड, विश्वनाथ कोळी, हेमंत पाटील, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सुर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, गव्हाण उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे, स्वप्नील ठाकूर, किशोर पाटील, अभिषेक भोपी, अंकुश ठाकूर, बी.के. ठाकूर, सुधीर ठाकूर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 
         नमो चषकच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या १७ समिती स्थापित करण्यात आल्या आहेत. या समितींनी आपल्या जबाबदारीचा आढावा यावेळी सादर केला. उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक संपन्न झाला पाहिजे, यासाठी आयोजन समितीमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले. तत्पूर्वी त्यांनी येथे होणाऱ्या स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी केली. 

चौकट - 
मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा २१ प्रकारात स्पर्धा झाल्या. यंदा नमो चषक २०२५ स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे. विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विविध समितींचा आढावा घेत उत्कृष्ट नियोजनासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. 

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image