मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, शेकाप नेते तथा पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : स्व. महेंद्र आमोलकचंदजी बांठिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ पनवेल मधील श्री जैन श्वेतांबर स्थानक ट्रस्ट, जायंटस् ग्रुप ऑफ पनवेल, निओ क्लिनिक व इको सेंटर, रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलाईट, आनंद धार्मिक ग्रुप, इनरव्हिल क्लब ऑफ न्यु पनवेल,मिनी फर्निशिंगस् यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शेकाप नेते तथा पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली.
या शिबीरासाठी तज्ञ डॉ. निलेश बांठिया, डॉ.अंकिता लोखंडे, डॉ.मंदार शहा, डॉ.कश्यप ठक्कर, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीरात मोफत चाचण्या करण्यात आल्या. सामाजिक बांधिलकीतून वरील सर्व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा नक्कीच गरजवंतांना लाभ होईल जेणेकरून भविष्यात उद्भवणाऱ्या आजाराला टाळण्यासाठी त्यांना मदत मिळेल. स्व. महेंद्रशेठ बांठिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्वांनी एक समाजाला चांगला आदर्श दिला त्याबद्दल प्रीतम म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले.