पनवेल महापालिकेच्यावतीने कुष्ठरोग निवारण दिन साजरा


पनवेल महापालिकेच्यावतीने कुष्ठरोग निवारण दिन साजरा

*महानगरपालिकेचे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग जनजागृती अभियान*



पनवेल,दि.30 :  दरवर्षी दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने आज पनवेल मनपाच्या सर्व नागरी  प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र ,आपला दवाखाना येथे गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी  सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुष्ठरोग मुक्तीबद्दल प्रतिज्ञा घेतली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात मनपा कार्यक्षेत्रात विशेष कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत कुष्ठरोग सर्वेक्षण करून जास्तीत जास्त कुष्ठरूग्णांचा शोध घेऊन त्यांना त्वरीत मोफत उपचार दिले जाणार आहेत. 

दरम्यान कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्याकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा, शालेय प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, पथनाट्य इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे येथे आज गुरूवारी रांगोळी स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 कोळीवाडा येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. तसेच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.

       कुष्ठरोग जनजागृती  व कुष्ठरूग्णाचे लवकर निदान त्यावरील त्वरीत उपचार हे या संपुर्ण अभियानाचे उद्दिष्ट हे आहे.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image