सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न

 सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न 




पनवेल(प्रतिनिधी) खांदा कॉलनी येथील सिकेटी कॉलेज अर्थात चांगु काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सन २००४ च्या बॅचच्या कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.       
          कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ रमेश यादव व सहकारी यांनी एकत्र येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार योग्यवेळी मिळाला तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध देखील घट्ट होते आणि हेच ऋणानुबंध जपण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करुन विद्यार्थी अपल्या जुन्या मित्रांसह शिक्षकांसोबत विचारांची देवाण घेवाण करतात. त्यामुळे जीवनात या स्नेहसंमेलनाला अनन्य साधारण महत्व असते. त्या पार्श्वभूमीवर हा आनंददायी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षक देखील उपस्थित होते .तसेच यावेळी सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी आज चांगल्या उच्च पदावर असल्याचा अभिमान यावेळी शिक्षकांनी व्यक्त करत सर्वाना आशीर्वाद दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात जवळपास १०० हून अधिक माजी विद्यार्थी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून आले होते .

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image