एच एम पी व्हायरसला घाबरायचे नाही...काळजी घ्यायची !
सतर्कता बाळगण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नवी मुंबई/प्रतिनिधी, दि. ८
सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (HMPV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी एचएमपीव्ही विषाणू हा तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्स येथे 2001 मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रो
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ या संदर्भातील सूचनांचे पालन करण्यात यावे.
हे करावे :
> जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
> साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
> ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
> भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
> संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये :
> हस्तांदोलन
> टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
> आजारी लोकांशी जवळचा संपर्क
> डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे
> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालये येथे सर्दी - खोकला अर्थात आयएलआय व सारी रुग्णांवर उपचार करण्यात येतो. HMPV बाबत आरोग्य विभागांतर्गत सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरूळ व ऐरोली येथे १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होण्याऱ्या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येईल.
तरी नवी मुंबईच्या नागरिकांनी