आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी लोकसेवक - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी लोकसेवक - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक

पनवेल प्रमाणे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक


पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी आज (०१ जानेवारी) येथे केले. महाराष्ट्रातील हे पहिले वैद्यकीय सहाय्यता कक्ष असून अशाचप्रकारे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

         केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाच्यावतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आले आहे. या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, उरणच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

      रामेश्वर नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले कि, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जागरूक आहे. पंचतारांकित अशा रुग्णालयात सुद्धा गोर गरिबांसाठी काही जागा आरक्षित करण्यात आले आहे. महात्मा फुले जीवनदायी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार देण्याचा उद्देश आहे. असे सांगतानाच या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी खूप चांगले काम केले असून पनवेलमध्ये उभारलेले हे वैद्यकीय सहाय्यता कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे पोर्टल या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 


 कोट-

  पनवेल आणि उरण विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी हे वैद्यकीय सहाय्य कार्यालय सदैव कटिबद्ध आहे. मोफत आणि स्वस्तात स्वस्त दरात वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी हे कार्यालय रुग्णांना मदत करणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा कोणकोणत्या आहेत याची माहितीही या कार्यालयातून नागरिकांना मिळणार असून आगामी काळात आरोग्य महाशिबिरे आयोजित करणार आहोत. - आमदार महेश बालदी

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image