सिडकोच्या बेलापूर-पेंधर मेट्रो मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून सुधारित वेळापत्रक होणार लागू;सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी धावणार मेट्रो

सिडकोच्या बेलापूर-पेंधर मेट्रो मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून सुधारित वेळापत्रक होणार लागू;सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी धावणार मेट्रो


नवी मुंबई-सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रोच्या फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. 

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सीबीडी बेलापूर परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. 

सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेऱ्यांचा लाभ व्हावा याकरिता सदर मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रो फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बेलापूर आणि पेंधर स्थानकांतून सकाळी 06.00 वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. बेलापूर येथून रात्री 22.00 वाजता व पेंधर येथून रात्री 21.45 वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी 07.30 ते 10.00 आणि सायंकाळी 05.30 ते 08.00 तर पेंधर येथून सकाळी 07.00 ते 09.30 आणि सायंकाळी 05.00 ते 07.30 दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image