कौथिग भाग :16” चे आयोजन, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : उत्तराखंड येथील रहिवासीयांच्या माध्यमातून देवभूमी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने “कौथिग भाग:-16” चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली. यामध्ये उत्तराखंड मधील संस्कृती ,खाद्य संस्कृती, तेथील लोककला या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते.
सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच सामाजिक कार्यक्रमांमध्ये आरोग्य शिबिर, रोजगार शिबिर आणि इतरही बरेच काही या ठिकाणी आयोजकांकडून आयोजित करण्यात आले होते. आजही कामानिमित्त नवी मुंबईत आल्यावर सामाजिक बांधिलकीतून असे उपक्रम आपले इतर राज्यातील बांधव आपल्यासोबत एकरूप होऊन आयोजित करतात याचे समाधान वाटत असल्याचे शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.