पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ०१ जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

 पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ०१ जानेवारीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण 



पनवेल (प्रतिनिधी) केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाच्यावतीने पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आला असून या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी १०. ३० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
         पनवेल तसेच उरण विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी हे कार्यालय वैद्यकीय सहाय्य करण्याच्या दुष्टीकोनातून सदैव काम करणार आहे. या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष, प्रविण मोरे यांनी केले आहे. 

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image