प्रभाग १७ अ चे उमेदवार शंकर वायदंडे यांची प्रचाराला जोरदार सुरवात
पनवेल प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 17 चे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकर मारुती वायदंडे यांच्या प्रचाराची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दि ०४ जानेवारी रोज तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सर्व महापुरुषाचा वंदना व जयघोष करून करण्यात आला
प्रचाराचा नारळ वंचित बहुजन आघाडी महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड महासचिव अविनाश अडगळे महासचिव संतोष मुजमुले यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकूव खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला अनेक महिलांनी या खेळाचा आनंद घेऊन पैठणी जिंकल्या
यावेळी पत्रकार शंकर वायदंडे यांनी प्रभाग क्रमांक 17 चा विकास करण्याचे वचन दिले असून प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वच प्रश्न सोडवण्याचे कटीबद्ध असल्याचे बोलत प्रभागातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून प्रभाग झोपडपट्टी मुक्त करणार असल्याचे सांगितले झोपडपट्याचे पुनर्वसन व्हावे ही प्रस्थापित नगरसेवकांची व पक्षांची मानसिकता नसल्यामुळे पनवेल मधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रखडले असून यासाठी मी प्रशासन दरबारी सर्व ठिकाणी पाठपुरावा करत असून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मला जनतेने उभे केले असून जनतेचा आवाज पालिकेच्या सभागृह द्यावे आता पर्यंत प्रस्थापित पक्षांनी प्रभाग १७ साठी अनुसूचित जातीचे सर्व उमेदवार नगरसेवक आयात केले आहेत आता स्थानिक नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभागातील पंचशीलनगर झोपडपट्टी मधून तळून तडफदार रायगड सम्राट न्यूज चे संपादक शंकर वायदंडे यांचे कडवे आव्हान असून शंकर वायदंडे यांच्या उमेदवारीने प्रभाग 17 मधील सर्व मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा देण्यात येत आहे मागील कार्यकाळातील नगरसेवक प्रकाश बिनेदार व यांचे सोबती कधीच प्रभागात फिरले नसून त्यांनी प्रभागासाठी कोणतेच काम केले नाही त्याचबरोबर मूलभूत सुविधा पाणी सुद्धा पोचवण्यास असमर्थक राहिले प्रभागात नियोजन शून्य कामगिरी व अवाजवी मालमत्ता करामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले असून प्रचंड प्रमाणात प्रस्थापित नगरसेवकांवरती नाराजी असल्याने नेहमी जनतेचे प्रश्न मांडणारे पत्रकार शंकर मारुती वायदंडे यांना मतदान करण्यासाठी सर्व मतदारांचे मतदारांचा कल आहे
यावेळेस स्थानिक समाजसेवक राहुल पोपलवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कुत्र्या मांजरा गाढवापेक्षा आपली किंमत कमी लावून आपले लोकशाही धोक्यात आणण्याचे धनाडे नगरसेवक काम करत असून दोनशे पाचशे रुपयासाठी पाच वर्षासाठी स्वतःला विकू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटने मधून आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे योग्य उमेदवार शंकर मारुती वायदंडे यांच्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद असून त्यांची ताकद पूर्णपणे शंकर वायदंडे यांच्या पाठीशी असून कोणाला घाबरण्याची गरज नाही यापुढे प्रभागाचा विकास आमच्या हक्काचा माणूस शंकर वायदंडेच करणार अशी ग्वाही दिली
तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी प्रचारादरम्यान सांगितले की बहुजनांच्या विकासासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पनवेल प्रभाग १७ चे उमेदवार शंकर मारुती वायदंडे पत्रकार असून समाजाची प्रश्नाचे जाणता व्यक्तिमत्व असून त्यांनी आतापर्यंत सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न आपल्या पत्रकार्तित मांडले असल्याने जनतेचा आवाज सभागृहात मांडण्यासाठी वंचित बहुजन पक्षाचा वतीने आम्ही उमेदवारी दिली असून नक्कीच आमचा विश्वास आहे की शंकर मारुती वायदंडे हे पनवेल महानगरपालिकेत प्रभाग 17 चा आवाज उठवत विकास कामे करतील आणि पनवेल मधील त्यांनी घेतलेले जनसामान्याचे व महिला भगिनींचे सर्वच प्रश्न सोडवण्याचे काम करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे सर्व जनतेने शंकर वायदंडे क्रमांक चार चे निशाणी गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने शंकर वायदंडे यांना विजयी करावे
या दरम्यान संतोष मुजमुले अविनाश आडागळे यांनी शंकर वायदंडे यांचे कौतुक करत मतदान करण्याचे आव्हान केले स्थानिक रहिवाशी प्रमोद कोळी पूनम कुंडलिक माघाडे यांनी आतापर्यंत आम्हाला नेतृत्व मिळाले नव्हते आत्ता शंकर दादाच्या रूपाने नेतृत्व मिळाले असून कार्य शून्य नगरसेवकांसमोर मोठे आव्हान उभे केले असून सर्व जनता शंकर वायदंडे यांच्या पाठीशी असून येत्या काळात आम्ही सर्व महिला व नागरिक जनतेला मध्ये प्रचार करून शंकर वायदंडे यांना विजयी करण्यासाठी सर्व जनतेच्या वतीने कायम सोबत असल्याचे सांगितले.
एकंदरीत प्रस्थापित नगरसेवकांचा नाकर्तेपणा कॉलनीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे काम न केल्याने तसेच झोपडपट्ट्यांच्या प्रश्न न मांडल्याने पनवेल मधील जनता वंचित बहुजन आघाडीच्या शंकर मारुती वायदंडे यांच्या पाठीशी असल्याचे दिसत असून या निवडणुकीत विजय नक्कीच शंकर वायदंडे यांचा होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले



