परवडणाऱ्या दरात रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मेडिकवर रुग्णालयाचे फॅमिली कार्ड

परवडणाऱ्या दरात रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मेडिकवर रुग्णालयाचे फॅमिली कार्ड


नवी मुंबई : सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी  सुलभ आणि परवडणाऱ्या दरातील आरोग्यसेवा उपलब्ध करत मेडिकवर हॉस्पिटलने मेडिकवर्ड फॅमिली कार्ड सादर केले आहे . उच्च-गुणवत्तेच्या वैद्यकीय सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्डमध्ये बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, डेकेअर सेवा, फार्मसी आणि इतर आवश्यक आरोग्य सेवा मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होतील. यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला व इतर वैद्यकिय सुविधांवर विशेष सवलत देण्यात आली आहे.

नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त श्री संजय पाटील यांच्या हस्ते हे फॅमिली कार्ड लाँच करण्यात आले. यावेळी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचे, नवी मुंबईचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, इंडियन मेडिकल असोसिएशन नवी मुंबईचे अध्यक्ष डॉ. घनशाम दुलेरा आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्थिक संकटाची पर्वा न करता प्रत्येक कुटुंब उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांना पात्र आहे. मेडिकवर्ड फॅमिली कार्ड लाँच करणे हे एकाच छताखाली सर्वच वैदयकिय सुविधा पुरवित परवडणाऱ्या दरात उपचार आणि गुणवत्ता राखणार आहे. आर्थिक भारामुळे कोणीही उपचारासाठी संघर्ष करू नये याकरिता  हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या फॅमिली कार्डची किंमत केवळ रु 500 इतकी आहे. अधिक माहितीसाठी नोंदणीकृत क्रमांक 040-6833-4455 वर कॉल करा.

“मेडिकवर हॉस्पिटल्स हे रुग्णांना विशेष काळजी आणि यशस्वी परिणामांसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आघाडीवर आहेत. फॅमिली कार्ड हे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनुभवाची हमी देते. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवांपासून ते फार्मसी आणि होम हेल्थकेअर सपोर्टपर्यंत, मेडीकवर्ड फॅमिली कार्ड हे सुनिश्चित करते की कुटुंबांना सवलतीच्या दरात प्रीमियम केअरचा लाभ घेता येईल. अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थिती ओढावलेल्या रुग्णांसाठी व्हिडिओद्वारे वैद्यकिय सल्ला आणि मोफत रुग्णवाहिका सेवा यासारख्या महत्त्वाच्या सुविधा फायदेशीर ठरतील. प्रत्येक कुटुंबाला आवश्यक वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणे हेच आमचे  मुख्य ध्येय्य असल्याची माहिती डॉ. माताप्रसाद गुप्ता (मेडिकवर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख) यांनी स्पष्ट केले.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image