सुमन केदारी यांचे दुःखद निधन

 सुमन केदारी यांचे दुःखद निधन 



उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पाणदिवे येथील रहिवाशी सुमन शिवाजी केदारी (वय ६५) यांचा गुरवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. सुमन केदारी या सर्वांच्या सुख दुःखात नेहमी धावून जायच्या. प्रेमळ व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. पती,४ मुले, ५ नाती असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. सुमन केदारी यांच्या मृत्यूने केदारी परिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. सुमन केदारी यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/१२/२०२४ रोजी श्री माणकेश्वर- उरण येथे संपन्न झाला. दिनांक २४/१२/२०२४ रोजी तेरावा विधी त्यांच्या राहत्या घरी पाणदिवे येथे संपन्न होणार आहे. या दुःखद प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image