अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा

 अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा 


अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी ( दि.  १५)  अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे - अलिबाग येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत दैनिक लोकमत चे संपादक अतुल कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत  सहभागी होण्यासाठी पत्रकारांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भारत रांजणकर 9226152489,  राजेश भोस्तेकर 9881878732 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी केले आहे.

सदर कार्यशाळा सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे.

ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली पूर्व नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जेवणासाठी शाकाहारी की मांसाहारी याबाबत माहिती द्यावी.

ही विनंती

Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image