शहरातील धूळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सलग 15 दिवस डीप क्लीनिंग मोहीमेचे नवी मुंबईत प्रभावी नियोजन
नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असतानाच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्य रस्ते व पदपथ यांची सखोल स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम (Deep Cleaning Drive) आखण्यात आलेली आहे. 30 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध रस्ते सफाईच्या सखोल स्वच्छता मोहीमांचे विभागनिहाय बारकाईने नियोजन करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचराव्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संतोष वारुळे यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे.
यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या व पदपथांच्या कडेला घट्ट झालेली माती मनुष्यबळाव्दारे साफ करण्यात येत असून त्यानंतर अत्याधुनिक फॉगर्स मशीनद्वारे पाणी मारुन रस्त्यांची सफाई देखील केली जात आहे. याकरिता महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून शुद्ध केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होत आहे. त्याचप्रमाणे हवेतील धूळीचे प्रमाणही कमी होउुन नवी मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होत आहे.
या डिप क्लीनिंग मोहिमेचा विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक दिवशी सखोल स्वच्छता करण्याचा रस्ता व परिसर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये –
30 डिसेंबर रोजी आम्र मार्ग उरणफाटा (बेलापूर विभाग), टी जंक्शन ते दिवा सर्कल (ऐरोली विभाग) या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 31 डिसेंबर रोजी अक्षर टॉवर रस्ता (बेलापूर विभाग), वाशी गाव प्रवेशव्दार ते नाखवा चौक तसेच वर्धमान पार्क ते बॉम्बे ॲनेक्स सेक्टर 17 (वाशी विभाग), कोपरी तलाव परिसर (तुर्भे विभाग), कोपरखैरणे स्टेशन रोड (कोपरखैरणे विभाग), कुलसूम हॉटेल ते बर्गर किंग सेक्टर 3 रेल्वे स्टेशन समोर (घणसोली विभाग) व दिघागाव कमान ते हिंदमाता शाळा (दिघा विभाग) या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नव्या वर्षाच्या प्रारंभी हवेची गुणवत्ता वाढ आणि स्वच्छ नवी मुंबईचा निर्धार करुन हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अधिक प्रभावी काम करण्याच्या दृष्टीने 13 जानेवारीपर्यंत सखोल स्वच्छता मोहीमांचे विभागनिहाय नियोजन करण्यात आलेले आहे.
या अंतर्गत 1 जानेवारी रोजी ज्वेल ऑफ नवी मुंबई रस्ता (बेलापूर विभाग), डि मार्ट समोरील रस्ते (तुर्भे विभाग), कांचनगंगा अपार्टमेंट ते डि मार्ट सर्कल (कोपरखैरणे विभाग), बर्गर किंग ते सेक्टर 6 नाला दोन्ही बाजू (घणसोली विभाग), दिवा सर्कल ते युरो स्कुल (ऐरोली विभाग) आणि ठाणे बेलापूर रस्ता ते राम नगर एमआयडीसी रोड (दिघा विभाग) या रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जाणार आहेत.
2 जानेवारी रोजी आग्रोळी सेक्टर 30 रस्ता (बेलापूर विभाग), प्रशांत कॉर्नर ते राजीव गांधी ब्रीज सेक्टर 6 (नेरुळ विभाग), शितल रेस्टॉरंट ते सेन्ट मेरी स्कुल सेक्टर 9 (वाशी विभाग), जयपूरीयार स्कुल व मोराज परिसर (तुर्भे विभाग), महापे एमआयडीसी रोड (कोपरखैरणे विभाग), बर्गर किंग ते सेक्टर 6 नाला दोन्ही बाजू (घणसोली विभाग), युरो स्कुल ते नेव्हा गार्डन (ऐरोली विभाग) व रामनगर एमआयडीसी रोड ते वोडाफोन कॉर्नर (दिघा विभाग) येथे डीप क्लीनिंग करण्यात येणार आहे.
3 जानेवारी रोजी सरोवर विहार सेक्टर 11 (बेलापूर विभाग), हायवे सिग्नल ते वाशी रेल्वे स्टेशन (वाशी विभाग), ओरिएन्टल कॉलेज ते कारशेड रोड (तुर्भे विभाग), डी मार्ट सर्कल ते तीन टाकी सिग्नल (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 6 नाला ते सेक्टर 6 चौक दोन्ही बाजू (घणसोली विभाग), नेव्हा गार्डन ते युरो स्कुल (ऐरोली विभाग) व वोडाफोन कॉर्नर ते स्मिथ हॉटेल (दिघा विभाग) येथे सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे.
4 जानेवारी रोजी हावरे सर्कल रस्ता (बेलापूर विभाग), पेट्रोल पंप ते हेल्थ ज्युस सेंटर सेक्टर 16 (नेरुळ विभाग), जैन मंदिर ते ॲपल केमिस्ट सेक्टर 10 (वाशी विभाग), गणपती पाडा मेन रोड (तुर्भे विभाग), तीन टाकी ते स्मशानभूमी रोड (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 6 नाला ते सेक्टर 6 चौक दोन्ही बाजू (घणसोली विभाग), युरो स्कुल ते दिवा सर्कल (ऐरोली विभाग) व एमआयडीसी रोड ते बिस्कीट गल्ली हजेरी शेड (दिघा विभाग) येथे डीप क्लीनिंग करण्यात येणार आहे.
5 जानेवारी रोजी दिवाळे जेटी आणि मार्केट (बेलापूर विभाग), गौरी कॉरी तुर्भे स्टेार (तुर्भे विभाग), तीन टाकी सिग्नल ते वरिष्ठा हॉटेल (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 10 पाम बीच रोड ते टेम्पटेशन चौक दोन्ही बाजू (घणसोली विभाग), दिवा सर्कल ते टि जंक्शन (ऐरोली विभाग) व स्मित हॉटेल ते पंढरपुरी चहा स्टॉल (दिघा विभाग) येथे डीप क्लीनिंग करण्यात येणार आहे.
6 जानेवारी रोजी डि मार्ट रस्ता ते सेक्टर 40 - 42 (बेलापूर विभाग), डि वाय पाटील सर्विस रोड सेक्टर 13 (नेरुळ विभाग), गावदेवी मंदिर ते शिवसेना शाखा जुहूगाव (वाशी विभाग), तुर्भे नाका ते लुब्रिझॉर कंपनी (तुर्भे विभाग), घणसोली नाका ते तीन टाकी सिग्नल (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 9 टेम्पटेशन चौक ते डि मार्ट दोन्ही बाजू (घणसोली विभाग), डि मार्ट ते जैव विविधता केंद्र (ऐरोली विभाग) आणि स्मित हॉटेल ते सीएनजी पंप रोड एमआयडीसी परिसर (दिघा विभाग) येथे डीप क्लीनिंग करण्यात येणार आहे.
7 जानेवारी रोजी नवीन सेक्टर 50 चा रस्ता (बेलापूर विभाग), ॲबोट हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाशी विभाग), मस्जिद परिसर सेक्टर 19 (तुर्भे विभाग), तीन टाकी ते डि मार्ट सिग्नल (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 9 टेम्पटेशन चौक ते डि मार्ट दोन्ही बाजू (घणसोली विभाग), जैवविविधता केंद्र ते डि मार्ट (ऐरोली विभाग) व दिघा रेल्वे स्थानक ते मुकंद कंपनी (दिघा विभाग) येथे डीप क्लीनिंग करण्यात येणार आहे.
8 जानेवारी रोजी नवीन एमजीएम हॉस्पीटल रस्ता सेक्टर 1 (बेलापूर विभाग), शिरवणे फाटा ते जुईनगर स्टेशन सर्व्हिस रोड (नेरुळ विभाग), बी वन टाईप ते बी टू टाईप अंतर्गत पायवाटा सेक्टर 6 (वाशी विभाग), मस्जिद परिसर सेक्टर 19 (तुर्भे विभाग), कलश उद्यान सिग्नल ते बालाजी गार्डन रोड (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 1 दुर्गा ते सेक्टर 1 पाम बीच रोड (घणसोली विभाग), गणपती मंदिर ते होल्डींग पॉंड (ऐरोली विभाग) व नमुंमपा शाळा क्रमांक 79 ते 108 (दिघा विभाग) याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
9 जानेवारी रोजी कोकण भवन सेक्टर 11 रस्ता (बेलापूर विभाग), भगवान कटपिस सेंटर ते विभाग कार्यालय सेक्टर 15 (वाशी विभाग), एपीएमसी परिसर (तुर्भे विभाग), कोपरखैरणे गाव तीन टाकी ते हनुमान मंदिर (कोपरखैरणे विभाग), सेक्टर 1 दुर्गा ते सेक्टर 1 पाम बीच रोड पर्यंत (घणसोली विभाग), होल्डींग पॉंड ते गणपती मंदिर (ऐरोली विभाग) व नमुंमपा विभाग कार्यालय ते कर्मचारी वसाहत (दिघा विभाग) येथे सखोल स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
10 जानेवारी रोजी सेक्टर 15 मुख्य रस्ता क्रोमा समोरील (बेलापूर विभाग), चिंचोली तलाव ते वीणा हॉटेल सेक्टर 24 जुईनगर (नेरुळ विभाग), एनएमएमटी डेपो ते सागर विहार सेक्टर 7 (वाशी विभाग), एपीएमसी मार्केट परिसर (तुर्भे विभाग), समतानगर बोनकोडे (कोपरखैरणे विभाग), साईबाबा मंदिर ते मुरबादेवी पामबीच रोड (घणसोली विभाग), फायरब्रिगेड ते ऐरोली नाका (ऐरोली विभाग) व दिघा रेल्वे स्थानक ते पटनी कॉर्नर (दिघा विभाग) याठिकाणी डिप क्लीनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे.
11 जानेवारी रोजी नेरुळ पोलीस स्टेशन रस्ता (बेलापूर विभाग), ब्ल्यू डायमंड ते आरजे कॉम्लेक्स सेक्टर 14 (वाशी विभाग), डी मार्ट सर्कल ते निसर्ग उदयान (कोपरखैरणे विभाग), साईबाबा मंदिर एनएमएमटी डेपो ते मुरबादेवी पामबीच रोड (घणसोली विभाग), फायरब्रिगेड ते सेक्टर 5 सिग्नल (ऐरोली विभाग) व पटनी रोड कंपनी कॉर्नर ते कंपनी गेट (दिघा विभाग) याठिकाणी सखोल स्वच्छता केली जाणार आहे.
12 जानेवारी रोजी आम्र मार्ग उरण फाटा रस्ता (बेलापूर विभाग), नेरुळ बस डेपो ते मास्टर नरेश चौक सेक्टर 15 (नेरुळ विभाग), घणसोली नाला ते धारण तलाव (कोपरखैरणे विभाग), साईबाबा मंदिर पामबीच रोड ते कौल आळी स्मशानभूमी (घणसोली विभाग), यादवनगर नाका ते काटई ब्रिज (ऐरोली विभाग) व पटणी कंपनी ते माइंडस्पेस कंपनी (दिघा विभाग) याठिकाणी डिप क्लीनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे.
तसेच 13 जानेवारी रोजी सीवूड्स रेल्वे स्टेशन रस्ता सेक्टर 23 – 25 (बेलापूर विभाग), डी मार्ट सर्कल ते रा.फ.नाईक विद्यालय (कोपरखैरणे विभाग), साईबाबा मंदिर पाम बिच रोड ते कौल आळी स्मशानभूमी दोन्ही बाजू (घणसोली विभाग), काटई ब्रिज ते यादव नगर नाका (ऐरोली विभाग) व माइंड स्पेस कंपनी गेट ते नेव्हा गार्डन सोसायटी (दिघा विभाग) याठिकाणी डिप क्लीनिंग मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे 13 जानेवारीपर्यंत सलग 15 दिवस सर्वच आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning Drive) प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून यामुळे मुख्य रस्ते, पदपथ याठिकाणी साठलेले मातीचे थर, धूळ यांची मनुष्यबळाव्दारे तसेच यांत्रिक वाहनांव्दारे सखोल स्वच्छता होणार आहे शिवाय हवेतील धुळीचे प्रमाण कमी होउुन नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यासही मदत होणार आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी या सखोल स्वच्छता मोहीमेस सहकार्य करावे व आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर म्हणून मानांकित होण्यासाठी कच-याचे घरातच वर्गीकरण करणे, हा वेगवेगळा कचरा वेगवेगळया स्वरुपातच कचरा गाडीत देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णत: टाळणे या सवयींचा अंगीकार करावा असे आवाहन करण्यात येत आहे.