नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बांधकामविषयक मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणा-या बांधकाम व्यावसायिकांकडून 1.17 कोटी दंडवसूली
मुंबई (प्रतिनिधी) -मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल करुन घेतलेल्या Suo Moto (PIL. No. ३/२०२३) मध्ये दि.११ डिसेंबर २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, वायु व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले होते.
मा. उच्च न्यायालयाकडील दि.११ डिसेंबर २०२३ रोजीचे आदेश तसेच ध्वनी/ वायू प्रदूषण त्याचप्रमाणे ब्लास्टींगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी / उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ‘मानक कार्यप्रणाली’ (Standard Operating Procedure - SOP) तयार करण्यात आलेली आहे. सदर मानक कार्यप्रणालीस महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची दि. १९ जून २०२४ रोजी मंजूरी प्राप्त झालेली आहे. या मानक कार्यप्रणालीनुसार आवश्यक त्या उपाययोजना करुन सदर मानक कार्यप्रणालीचे बांधकाम व्यवसायकांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे असे यापूर्वीच सूचीत करण्यात आले आहे.
सदर "मानक कार्यप्रणाली" ("Standard Operating Procedure (SOP)") चे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने मानक कार्यप्रणालीमधील मुद्दा क्र. १२ अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर "टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आलेली आहे.
मुद्दा क्र. १२ मध्ये नमूद कार्यप्रणाली अन्वये संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून आपला अहवाल सहाय्याक संचालक, नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने स्थळपाहणी दरम्यान तपासावयाच्या बाबींची तपाससूची (Check List) तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बांधकाम सुरु असलेल्या स्थळांची वेळोवेळी पाहणी करुन त्याचे अनुपालन करणे अनिर्वाय करण्यात आलेले आहे.
त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यक्षेत्रामधील बांधकाम सुरु असलेल्या 78 स्थळांची पाहणी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली असून सदर बांधकामाच्या ठिकाणी "मानक कार्यप्रणाली" (Standard Operating Procedure - SOP) च्या तपाससूची (Check List) नुसार आढळून आलेल्या त्रुटीं करिता संबंधीत विकासकांकडून एकूण रु. 1 कोटी 17 लक्ष 16 हजार 931 इतक्या रक्कमेच्या दंडात्मक शुल्काची आकारणी करुन त्याची वसूली बांधकाम व्यवसायांकडून घेणेबाबत नमुंमपा आयुक्त यांचे निर्देशानुसार संबंधीत विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या असून सदर मानक कार्यप्रणालीचे (SOP) उल्लघंन करणाऱ्या विकासकांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे.