लोकप्रिय उमेदवार प्रितम म्हात्रे यांचा चौकमध्ये घर भेटीवर भर

 लोकप्रिय उमेदवार प्रितम म्हात्रे यांचा चौकमध्ये घर भेटीवर भर



पनवेल: उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी चौक परिसरात कार्यकर्ते गाव आणि घर भेटीवर भर देत असल्याचे दिसत आहे. 

      उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ठीक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग यांच्याकडून स्वागत केले जात आहे. गाव भेटीवर प्रीतम म्हात्रे यांनी विशेष लक्ष दिले आहे. प्रीतम म्हात्रे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून गावोगावी त्यांचे स्वागत केले जात आहे. प्रितम जे एम म्हात्रे यांच्या वतीने चौक जवळ त्यांनी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केल्याने सर्व सामान्य कुटुंबातील मुलांच्या इंग्लिश स्कूलचे स्वप्न पूर्ण झाले आहे, त्याच ठिकाणी पंचायतन मंदिर बांधले आहे. या ठिकाणी अनेक भाविक येतात. हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण आहे. इरसाल वाडी येथे झालेल्या दुर्घटनेत प्रितम म्हात्रे यांनी दुर्घटनाग्रस्त यांच्या जेवणापासून ते राहण्यापर्यंतची सोय कंटेनर हाऊस येथे राहण्यास ते जाईपर्यंत केली. त्यामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद प्रीतम म्हात्रे यांना लाभत आहे.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image